Ad will apear here
Next
व्ही. जी. जाना यांना सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार
राज्यमंत्री विजय गोयल यांच्या हस्ते व्ही. जी. जाना यांना कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे ‘सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार २०१९- इंडस्ट्री कॅप्टन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे : अभियांत्रिकी व बांधकाम उद्योगातील ५५ वर्षांहून अधिक काळाच्या बहुमोल व महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी, व्ही. जी. जाना यांना कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे (सीआयडीसी) राष्ट्रीय पातळीवरील ‘सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार २०१९- इंडस्ट्री कॅप्टन’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या २३ व्या वार्षिक दिन महोत्सवात राज्यमंत्री विजय गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत जाना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ‘सीआयडीसी’चे अध्यक्ष डॉ. पी. एस. राणा, निवड समिती अध्यक्ष प्रदीप भार्गवा, त्रिपुरा स्टेट प्लॅनिंग बोर्डचे उपाध्यक्ष आर. के. माथूर आणि ‘सीपीडब्ल्यूडी’चे डीजी प्रभाकर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

नीती आयोगाने इंडियन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीच्या समवेत कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट कौन्सिलची (सीआयडीसी) निर्मिती केली आहे. हे राष्ट्रीय पातळीवरील एक उच्च मंडळ असून, भारतीय बांधकाम उद्योग क्षेत्रात चांगल्या योजना कार्यान्वित करण्याच्या काम ते करत आहे. बांधकाम उद्योगाची वाढ व विकास व्हावा या उद्देशाने ‘सीआयडीसी’ने या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी ‘सीआयडीसी विश्वकर्मा’ पुरस्कार सुरू केला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZMDBY
Similar Posts
‘बीएआय’तर्फे व्ही. जी. जाना यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे : बांधकाम क्षेत्रात होणार्‍या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या हेतूने बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे वार्षिक वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार सोहळा नुकताच पुण्यात झाला.
महिला कामगार करणार गवंडीकामही; प्रशिक्षणाने दिला आत्मविश्वास पुणे : इमारत बांधकामाच्या ठिकाणी महिला प्रामुख्याने दिसतात त्या ओझी वाहण्याचे काम करताना; पण पुण्यातील काही इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी आता महिला कामगार गवंडीकाम करतानाही दिसणार आहेत. ‘क्रेडाई’तर्फे काही महिलांना त्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, कौशल्यवृद्धीमुळे या कामगारांना कामाचा अधिक मोबदला मिळणार आहे
‘बीओसीडब्ल्यू’ तर्फे बांधकाम कामगारांना १९ कोटी रुपयांचे लाभ वितरीत पुणे : ‘‘बीओसीडब्ल्यू’ अर्थात ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत पुण्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आतापर्यंत १९ कोटी रुपयांचे लाभ वितरीत करण्यात आले असून, ३४ हजार कामगारांना त्याचा फायदा मिळाला आहे,’ अशी माहिती कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली.
‘पीसीईआरएफ’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन पुणे : बांधकाम क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘पीसीईआरएफ-कुमार बेहरे कन्स्ट्रक्शन सेफ्टी अॅवॉर्ड २०२०’ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ‘पीसीईआरएफ’ अर्थात पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रिसर्च फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language